नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडरचे दर वाढले त्याबरोबरच सोन्या-चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातील ग्राहकांना महागाईचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. मौल्यवान धातूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

वाढणारी महागाई, चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच डॉलरच्या संख्येतही वाढ झाली आहे.

भारतात लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यातच सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागतेय.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 55,190 रूपयांवर आला आहे.

तर आज भारतीय बाजारपेठेत चांदीचा दर 69,610 रूपयांवर व्यवहार करत आहे.

सोन्या-चांदीचे हे वाढलेले दर महाराष्ट्रासह, दिल्ली आणि कोलकातामध्येही सारख्याच प्रमाणात आहेत.

जागतिक बाजारातील मौल्यवान धातूंची किंमत पाहता स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.5% वाढून $1,886.70 प्रति औंस झाले.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.