आज 14 एप्रिल म्हणजेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आज शेअर बाजार बंद असणार आहे. आज गुंतवणूकदार BSE आणि NSE वर व्यवहार करू शकणार नाहीत. शेअर बाजारासोबतच इक्विटी सेगमेंटमध्येही व्यवहार बंद असणार आहेत. शेअर बाजाराच्या एप्रिल 2023 च्या हॉलिडेच लिस्टनुसार, भारतीय शेअर बाजारात आज कोणतेही व्यवहार होणार नाहीत. bseindia.com नुसार, भारतीय शेअर बाजारात आज कोणतीही ट्रेडिंग अॅक्टिव्हिटी होणार नाही. अनेक ठिकाणी बँका आणि सरकारी कार्यालयंही बंद राहतील. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती व्यतिरिक्त काही राज्यांमध्ये वैशाखी, तामिळ नववर्ष दिन, चिरवाबा, बिजू महोत्सव आणि बोहाग बिहू निमित्त सुट्टी असेल.