जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत सातत्यानं वाढ होतेय. गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूड 2 डॉलरपेक्षा जास्त महागलं असून 87 डॉलर्सचा दर ओलांडलाय. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दर देखील प्रति बॅरल 83.16 डॉलरपर्यंत वाढलाय. आज 12 एप्रिल रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. जवळपास 10 महिन्यांपासून देशात दर स्थिरच आहेत. यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते, मात्र तेव्हापासून दर स्थिरच आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर विकलं जातंय. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. भारतात सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 113.30 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय.