भारतातील पेट्रोल-डिझेलची किंमत सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता जाहीर करतात.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे ही किंमत निश्चित केली जाते.

WTI क्रूड ऑईल 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 80.70 प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

ब्रेंट क्रूड ऑईल 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 85.12 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.

दिल्लीत आज (शनिवार) पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटरवर नोंदवलं गेलं आहे.

चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.