भारतीय तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता अपडेट करतात. देशात इंधन किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत, मात्र कच्च्या तेलाच्या किमतींत सातत्यानं चढ-उतार होत आहेत. आज 14 एप्रिल रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. जवळपास 10 महिन्यांपासून दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 86.46 डॉलर आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड प्रति बॅरल 82.54 डॉलरवर आहे. यापूर्वी इंधनदरांमध्ये शेवटचा देशव्यापी बदल गेल्या वर्षी 21 मे रोजी झाला होता.