काही देशातील लोक साप, विंचू, बेडूक आणि इतर कीटकही खातात, हे तुम्ही ऐकले असेल. पण चीनमधील लोक तर विविध प्राणी आणि कीटकांसह दगडही चोखून खातात.



भारताचा शेजारील देश चीनमधील लोक दगड चोखण्यासाठीही मोठी किंमत मोजतात. चीनी लोक दगड चोखून खातात.



चीनमधील लोक अतिशय आवडीने दगड चोखून खातात. हा पदार्थ संपूर्ण चीनमध्ये खूप लोकप्रिय आहे.



हा चीनमधील पारंपारिक पदार्थ असून खास कार्यक्रमांमध्ये या पारंपारिक डिशचा बेत असतो



चीनमध्ये या खाद्यपदार्थाला सुओडीयू असं म्हणतात. स्टोन फ्राय म्हणजेच सुओडीयू हा पदार्थ ही चीनची पारंपारिक डिश आहे. याचे अनेक वैद्यकीय फायदे देखील आहेत.



या स्टोन फ्राय डिशसाठी मोठी किंमतही मोजावी लागते, ती ऐकूनही तुम्ही चकित व्हाल.



फक्त दगड चोखण्यासाठी स्टोन फ्राय डिशसाठी सुमारे 200 रुपये मोजावे लागतात. या स्टोन फ्रायच्या एका प्लेटमध्ये सुमारे 22 ते 25 दगड असतात.



हे दगड चोखून त्यानंतर ते तुम्ही घरीही नेऊ शकता किंवा त्यापासून पुन्हा स्टोन फ्राय देखील तयार करु शकता.



सुओडीयू बनवण्यासाठी सर्वात आधी नदीतून विशिष्ट प्रकारचे गुळगुळीत दगड आणले जातात. हे दगड काळ्या रंगाचे असतात. यानंतर हे दगड चांगले स्वच्छ केले जातात.



त्यानंतर हे दगड तेल, मसाले, सॉस, काळी मिरी आणि काही इतर मसाले घालून तळले जातात. यासोबत सूपही असतं.



दगड चोखून झाल्यावर ते तुम्ही टाकून देऊ शकता किंवा पुन्हाही वापरु शकता.