गणेशोत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक असल्याने तयारीला वेग आला आहे. लवकरच बाप्पाचे घरोघरी आगमन होणार असल्याने लोकांनी खरेदीला सुरुवात केली आहे.
बाजारपेठासुद्धा यासाठी सजल्या असून सजावटीसाठी नव-नवीन साहित्य बाजारात आले आहे.
गणेशोत्सव म्हटलं की, गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती बघायला मिळतात.
आपल्या घरातील मूर्ती सगळ्यात सुंदर आणि आकर्षक असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
त्यात पर्यावरणपुरक मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारचे फेटे घालून असलेले गणपती तर कधी इको फ्रेंडली गणपतीच्या शोधात असतात मात्र यंदा बालगणेश मूर्तीला चांगलीच पसंती मिळत आहे.
यात आपल्या लाडक्या बाप्पांचं लहान रूप पाहायला मिळणं म्हणजे भाविकांसाठी पर्वणीचं..
कुठे हसरा तर कुठे निवांत बसलेले बाप्पा सध्या बाजारात पाहायला मिळत आहेत.
बाळगणेशाचं हे रूप पाहून कोणीही त्याची दखल घेतल्याशिवाय राहू शकत नाही.