अंतराळवीरांसाठी विशेष पद्धतीचे शौचालय तयार केले जातात. हे विशेष शौचालये सामान्य शौचालयासारखीच दिसतात. अंतराळवीरांच्या शौचालयात विशेष व्हॅक्यूम यंत्रणा असते. हवेच्या माध्यमातून मानवी मैला एका टाकीत ढकलले जाते. या शौचालयात अंतराळवीर सहजपणे उभे राहू शकतात आणि बसू शकतात. अंतराळवीरांना मूत्रविसर्जनासाठी एक विशेष व्हॅक्यूम पाईप असतो. लघुशंका करण्यासाठी याचा वापर अंतराळवीर करतात. त्यामुळे अंतराळात वेगवेगळे शौचालये असतात. अंतराळात मलमूत्राला वेगळ्या टाकीत ठेवले जाते. याआधी अंतराळवीर पाऊचचा वापर करत असे.