मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठ्या डोंबिवली रोझ फेस्टिवलचे उद्घाटन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत झाले.
राज्यातील विविध भागातून आलेल्या गुलाब पुष्प स्पर्धेत वांगणीच्या आशिष मोरे यांच्या मोरे नर्सरीच्या गुलाबांनी गुलाबांचा राजा व गुलाबांची राणी हे दोन्ही पुरस्कार पटकवले.
नामदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलचे यंदाचे 13 वे वर्ष आहे.
पुणे रोझ फेडरेशनच्या फुलांना राजकुमार तर वांगणीच्या चंद्रकांत मोरे नर्सरीला राजकुमारीचा पुरस्कार मिळाला.
गुलाब पुष्प स्पर्धेचे परीक्षण डॉ विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे यांनी केले.
रोजच्या धकाधकीच्या जीवनाने त्रस्त झालेल्या समस्त डोंबिवलीकरांसाठी नवीन वर्षाची गोड सुरुवात व्हावी म्हणून गेली डोंबिवली रोझ फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे
13 ते 15 जानेवारीपर्यंत रामनगर येथील बालभवन रसिक गुलाबप्रेमींसाठी विनामूल्य
या वर्षी सुमारे हजारावर गुलाब पुष्पे प्रदर्शनात मांडली असून शेकडो रंग, सुवासाची फुले पाहायला मिळतील.
त्याच बरोबर दुरंगी, रेघांची, मिनिएचर स्वरूपातील गुलाब पाहण्यासाठी लोकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली.
सांगलीच्या पटवर्धन यांची अनेक देशांनी प्रसिद्ध केलेली गुलाब चित्र टपालतिकिटे प्रदर्शनात मांडलेली पाहायला मिळतील अशी माहिती नामदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.