पनवेलमध्ये शुक्रवारी जाळपोळीची घटना घडली. अज्ञात माथेफिरुने पाच वाहनांची जाळपोळ केली. पनवेलमधील नाट्यगृहाच्या जवळ शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामध्ये 1 ट्रॅक्टर, तीन दुचाकी, आणि एका रिक्षाला आग लावली. पनवेल पोलिसांकडून माथेफिरुचा शोध सुरु आहे. ज्या ठिकाणी गाड्या जाळल्या तिथल्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये माथेफिरु कैद झाला असून लवकरच त्याला अटक केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं मागील महिन्यात खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील अशाच प्रकारे वाहनांची जाळपोळ झाली होती. या घटनेत 40 ते 45 दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.