आता मुंबईहून अलिबागला (Mumbai Raigad) जाण्याचा वेळ आणखी कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले आहे असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई ते अलिबाग हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतीक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले आहे. असून या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसणार आहे. ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई ट्रांस हार्बर लिंक पॅकेज 2 मधील एकूण 32 ओएसडी स्पॅनपैकी 15 ओएसडी स्पॅन आधीच स्थापित केले गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत 180 मीटरचा हा पॅकेज 2 मधील सर्वात लांब ओएसडी स्पॅन स्थापित करण्यात आला.