यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे
यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.
परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परिक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल.