पाणबुडी 'वागीर' च्या सागरी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर वागीर पाणबुडी याच वर्षी नौदलाच्या ताफ्यात सामील होणार प्रोजेक्ट 75, यार्ड 11879, भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील पाचव्या पाणबुडीने 1 फेब्रुवारी तिच्या सागरी चाचण्या सुरू केल्या आहेत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) च्या कान्होजीआंग्रे वेट बेसिनमधून 20 नोव्हेंबर रोजी पाणबुडीला लॉन्च करण्यात आले कार्यान्वित झाल्यानंतर पाणबुडीचे नाव वागीर ठेवण्यात येणार आहे. कोविड महामारी असूनही, MDL ने 2021 मध्ये प्रकल्पाच्या दोन पाणबुड्या डिलिव्हर केल्या आहेत या पाणबुडीच्या सागरी चाचण्यांना सुरुवात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे