पाकिस्तानविरोधात केएल राहुल याने भारतीय संघात कमबॅक केलेय. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागेवर केएल राहुल याला संधी मिळाली आहे. टीम इंडियात कमबॅक करताच राहुलने मोठा विक्रम केला आहे. केएल राहुलने वनडे क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा पल्ला पार केला आहे. राहुलने फक्त 53 डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात वेगवान दोन हजार धावा पूर्ण करणारा राहुल भारताचा तिसरा फलंदाज ठरलाय शिखर धवन पहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर सिद्धू अन् गांगुली आहेत. या यादीत आता राहुलचे नाव जोडले गेलेय विराट कोहलीनेही 53 डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. राहुलने या विक्रमाची बरोबरी केली राहुलने 53 डावात 45.52 च्या सरासरीने दोन हजार धावा केल्यात. राहुलने वनडेत पाच शतके आणि 13 अर्धशतके ठोकली आहेत.