ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांच्या जयघोषत शेगावच्या
श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.
बुधवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी गाव
ओलांडून सोलापूर जिल्हय़ात उळेगावाच्या शिवारात आगमन झाले.
गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गजानन महाराजांच्या पादुकाचे आशीर्वाद घेत पुष्पहार अर्पण करत स्वागत गेले.
श्री गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 54 वे वर्ष आहे.
शेगाव ते पंढरपूर असे जवळपास 500 किलोमीटर अंतर पायी चालत ही वारी पांडुरंगाच्या भेटीला जात असते.
जवळपास 29 दिवसांचा पायी प्रवास करीत या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.