श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

भक्तांना आयुष्याच्या मार्गावर मार्गदर्शन करणाऱ्या स्वामींचरणी आज सर्वजण नतमस्तक होत आहेत.

स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात पहाटेपासून मोठी रांग लागली आहे.

पहाटे 5 वाजता दैनंदिन काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर मंदिरात भजन कार्यक्रम पार पडला.

तर दुपारी 12 नंतर मंदिरात स्वामी समर्थांचा पाळणा सोहळा संपन्न झाला

पाळणा सोहळ्यानंतर आज दुपारी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र इत्यादी राज्यातील भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत.

भाविकांसाठी मंदिरात महाप्रसादची सोय देखील करण्यात आली आहे.

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट इथे अवतरले असे सांगितलं जातं.