अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. स्पृहानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडिया शेअर केले. स्पृहानं या फोटोला 'Life is better when you’re smiling' असं कॅप्शन दिलं आहे. स्पृहानं जांभळी साडी आणि ऑक्साइडचे दागिने या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. स्पृहाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 13 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी स्पृहाच्या या फोटोला लाइक केलं आहे तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. स्पृहा वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मोरया, देवा या चित्रपटांमध्ये स्पृहानं काम केलं. तसेच स्पृहानं अग्निहोत्र,आभाळमाया,उंच माझा झोका या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. स्पृहा ही नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.