प्रिया बापट ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्री प्रिया बापटनं (Priya Bapat) नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ट्रेडिशनल लूकमधील फोटो प्रियानं शेअर केले आहेत. प्रियाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. प्रियाच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच प्रियानं बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटामध्ये प्रियानं महत्वाची भूमिका साकारली आहे. प्रियानं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते.