गोल्डन ग्लोब पुरस्कारा सोहळ्यासाठी राम चरणनं डॅशिंग लूक केला होता.
ज्युनियर एनटीआरनं गोल्डन ग्लोब पुरस्कारा सोहळ्यासाठी ऑल ब्लॅक आऊटफिट असा लूक केला होता.
आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कारा सोहळ्यासाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांनी रेड धोती, ब्लॅक कुर्ता असा लूक केला होता.
एस. एस. राजामौली यांच्या पत्नीनं देखील गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
राम चरण, ज्युनियर एन.टी.आर आणि एस.एस. राजामौली यांनी गोल्डन ग्लोब पुुरस्कार सोहळ्यासाठी केलेल्या लूकचं अनेक जण कौतुक करत आहेत.
आरआरआरमधील नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ब्लोब पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी संगीतकार एम एम कीरावानी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
पुरस्कार सोहळ्यातील फोटो आरआरआर मुव्ही या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत.
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली.