दुखापतीनंतरही नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभाग घेतला.
डायमंड लीग स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
सराव सत्रादरम्यान डाव्या हाताला झालेल्या दुखापतीनंतरही नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभाग घेतला.
ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात 87.86 मीटरची फेक करत दुसरे स्थान मिळवले.
यानंतर मात्र त्याला याहून सर्वोत्तम फेक करता आली नाही.
जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 85.97 मीटरसह तिसरे स्थान पटकावले.
नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर नेमबाज मनू भाकरने पोस्ट करत कौतुक केलं आहे.
लवकरात लवकर बरे होऊन, पुढील वर्षांत तुला आणखी यश मिळावे, असं मनू भाकरने म्हटलं आहे.
मनू भाकरने पोस्ट केल्यानंतर नीरज चोप्रासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक्सच्या समारोपानंतर नीरज एका कार्यक्रमात दिसला, जिथे मनू आणि तिची आई देखील उपस्थित होती.
मनूची आई आणि मनू नीरजसोबत व्हिडिओमध्ये बोलताना दिसल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर ‘रिश्ता पक्का’ अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या होत्या.