नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता हार्दिक पांड्या एका ब्रिटीश गायिकेला डेट करत असल्याचा दावा जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे, लंडनमधील एसेक्समध्ये जन्मलेल्या जास्मिनचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. 'द ओनली वे इज एसेक्स' या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही मालिकेचा भाग बनल्यानंतर जास्मिनने पहिल्यांदा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. जास्मिननने पहिल्यांदाच जॅक नाईटसोबत परफॉर्म केले आणि 2018 मध्ये 'सोनू के टीटू की स्वीटी' या बॉलिवूड चित्रपटासाठी 'बम डिगी डिगी बम' या गाण्याचा रिमेक करण्यात आला, तेव्हा तिची लोकप्रियता अधिकच वाढली. जास्मिन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे 6.4 लाख फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर जास्मिनला 5.7 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे.