पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची काल (11 ऑगस्ट) सांगता झाली. 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

Image Source: PTI

यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली.

Image Source: PTI

पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप सोहळा फ्रान्समधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर झाला.

Image Source: PTI

या सोहळ्यासाठी स्टेडियमचे थिएटरमध्ये रूपांतर करण्यात आले. स्टेडियमचा नजारा पाहण्यासारखा होता.

Image Source: PTI

या सोहळ्यात अनेक कलाकारांनी सर्वांचे मनोरंजन केले.

Image Source: PTI

या समारोप सोहळ्यात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ देखील उपस्थित होता.

Image Source: PTI

या सोहळ्यात एक परेडही झाली, ज्यामध्ये सर्व खेळाडू आपापल्या देशांचे झेंडे घेऊन दिसले.

Image Source: PTI

भारताकडून हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर ध्वजवाहक म्हणून दिसले.

Image Source: PTI

समारोप समारंभात स्टेडियममध्ये लेझर शो झाला. या लेझर शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Image Source: PTI