पॅरिस ऑलिंपिक विजेता स्वप्निल कुसाळे याचे आज कोल्हापुरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले.
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे या नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले होते .
स्वप्निलच्या स्वागताची जंगी तयारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती.
ताराराणी चौकापासून दसरा चौकापर्यंत स्वप्निलची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली.
हलगी, लेझीम, ढोलताशाच्या गजरात स्वप्निलचे स्वागत करण्यात आले.
सोबतच ताराराणी चौकातून दसरा चौकापर्यंत तीन ठिकाणी स्वप्निलवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीही केली गेली.
स्वप्निलच्या स्वागतासाठी सकाळी 8 वाजल्यापासून ताराराणी चौकातून दसरा चौकापर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि खासदार शाहू छत्रपती यांनी स्वप्नीलचं स्वागत केलं.
कोल्हापूराच्या क्रीडा समुदायासाठी आणि संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण होता.