भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
नीरज चोप्राने या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे.
याआधीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदकाची कामगिरी केली होती.
भालाफेकमध्ये प्रमुख लढत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यात होती.
अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटर थ्रो टाकला. अर्शद नदीमनं टाकलेला थ्रो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरला.
नीरज चोप्राचा दुसरा थ्रो 89.45 मीटर होता, त्याचे इतर थ्रो लाईन क्रॉस केल्यानं बाद ठरले.
यामुळं नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकलं.
रौप्य पदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या.
सध्या पदक मिळालं आहे. हातात तिरंगा आहे.
मला खूप आनंद होत आहे. आणखी भरपूर काम करायचं बाकी आहे.