भारतीय संघ या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे.

Published by: जयदीप मेढे

अंशुल कंबोज याचा उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला झालेल्या दुखापतीमुळे अंशुलला भारतीय संघात बॅकअप म्हणून संधी दिली गेली आहे.

अंशुल इंग्लंड दौऱ्यात इंडिया ए टीमचा भाग होता. अंशुलने जून महिन्यात 3 दिवसीय सामना खेळला होता.

अंशुलने 2 सामन्यांमध्ये 131 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

अंशुलने 2 सामन्यांमध्ये 76 धावाही केल्या होत्या.

त्यामुळे अंशुलला भारताच्या मुख्य संघात संधी देण्यात यावी, अशा चर्चा सुरु होती. तेव्हा अंशुलला संधी मिळाली नाही.

मात्र अखेर आता अंशुलचा समावेश करण्यात आला आहे.