टीम इंडियाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.



या सामन्यात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स घेतल्या.



फायनलचा महामुकाबला 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.



हा सामना पाहण्यासाठी पीएम मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत.



न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेत टीम इंडियाची फायनल निश्चित केलेल्या मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप कौतुक केले.



ते म्हणाले की, मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. शमी छान खेळला!



यंदाच्या विश्वचषकात शमीने सहा सामन्यांत 23 बळी घेतले आहेत.



न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.



या सामन्यात कोहलीने आपले 50 वे शतक पूर्ण केले.



भारतीय संघाचा विश्वचषकातील हा सलग 10वा विजय आहे.