बहुतांश देशांचा एक राष्ट्रीय खेळ असतो. भारताचा कोणताही अधिकृत राष्ट्रीय खेळ नसल्याचं सांगितलं जातं. पण, अनेकांचं असं मत आहे की, कबड्डी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. मात्र, कबड्डी हा भारताचा नाही तर 'या' देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. हा देश भारताच्या शेजारी आहे. तुम्हाला माहितीये का? कबड्डी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. कबड्डी बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. याला 'हू तू तू' या नावानेही ओळखलं जातं. कबड्डी बांगलादेश येथील लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ नेपाळ, श्रीलंका आणि पाकिस्तान मध्येही लोकप्रिय आहे