पालकमुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. पालकात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. पालक नियमित खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहते, डोळे निरोगी राहतात, मधुमेहापासून आराम मिळतो. मात्र, काही जणांना पालकाची अॅलर्जी असते. अशा लोकांनी पालकाचे सेवन करू नये. पालकमुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. जर कोणाला ऍलर्जीचा त्रास असेल तर त्यांनी पालकापासून दूर राहावे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पालकामध्ये हिस्टामाईन आढळते, जे खाल्ल्याने काही लोकांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी पालकाचं सेवन करू नये.