साऊथ चित्रपट बघायला अनेकांना आवडतात. साऊथ चित्रपटांमध्ये अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका असतो. या वीकेंडाला तुम्ही हे साऊथ चित्रपट बघू शकता. 2005 मध्ये रिलीज झालेला अपरिचित हा साऊथ चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता. या सस्पेन्स, थ्रिलर चित्रपटात अभिनेता विक्रमनं प्रमुख भूमिका साकारली आहे. धनुषचा मारी हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा मूळ चित्रपट तमिळ भाषेत असला तरी हिंदीमध्ये डब केला आहे. मारी या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच मारी-2 हा चित्रपट 2028 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात तुम्हाला अॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्स बघायला मिळेल. शिवाजी द बॉस हा 2007 मध्ये रिलीज झालेला साऊथ चित्रपटसृष्टीतील एव्हर ग्रीन चित्रपट आहे. शिवाजी द बॉस या चित्रपटामधील रजनीकांत यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. कांतारा या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. कांतारा या चित्रपटामध्ये ऋषभ शेट्टीनं प्रमुख भूमिका साकारली. आरआरआर या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आरआरआर या चित्रपटातील ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांचा अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला.