बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. कियाराचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कियारा ही सध्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटसाठी कियारानं खास लूक केला होता. कियारानं तिच्या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. रेड क्रॉप टॉप, रेड प्रिंटेड जॅकेट आणि मोठे इअरिंग्स अशा लूकमधील फोटो कियारानं शेअर केले आहेत. कियाराच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहेत. अनेक नेटकरी कियाराच्या या लूकचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. कियाराचा चाहता वर्ग मोठा आहे. कियारा तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.