मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.



नुकतेच प्रार्थनानं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



साडी, चंद्रकोर आणि गजरा अशा लूकमधील फोटो प्रार्थनानं शेअर केले आहेत.



प्रार्थनाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.



प्रार्थनाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेमधून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीस आली.



प्रार्थनाला इन्स्टाग्रामवर 2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.



प्रार्थनाचा चाहता वर्ग मोठा आहे.



प्रार्थनाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.



प्रार्थना तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.