मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या तिची स्पेन ट्रीप एन्जोय करत आहे. स्पेनमधील फोटो सई सोशल मीडियावर शेअर करत आहे. सईच्या स्पेन ट्रीपच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. सईनं स्पेनमध्ये मिरची देखील खाल्ली आहे. सईनं या फोटोला कॅप्शन दिलं,'तिखट गोड Spain' स्पेनमध्ये सईनं Churros And Dark Chocolate चा देखील आस्वाद घेतला. Churros And Dark Chocolate चा फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केला. सईच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सईला इन्स्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. सईचा चाहता वर्ग मोठा आहे.