दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात आणि राज्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ता बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मलायका अरोराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन योगाचे फायदे सांगितले आहेत. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शन लिहिले - 'हे माझे विचार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा.'
मलायकानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये योगा करण्याचे फायदे लिहिले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये ते योगा करताना दिसत आहेत.
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर देखील योगा करते. योग दिनानिमित्त तिनं योगा करतानाचा एक फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाहने इन्स्टाग्रामवर योगा करतानाचा फोटो शेअर केला आणि लिहिले - वही शून्य है, वही इकाई.
अभिनेत्री ईशा देओलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर योगा करतानाचा एक फोटो शेअर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
करीना कपूर खाननेही सैफ अली खान आणि तिच्या मुलांचे फोटो शेअर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
करीनानं शेअर केलेल्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले.