साऊथ स्टार सूर्याप्रमाणेच त्याची पत्नी ज्योतिका देखील साऊथ मनोरंजन विश्वाची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.



18 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबईत जन्मलेल्या ज्योतिकाने कन्नड, मल्याळम, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.



दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये ज्योतिकाचे नावही आहे. साऊथच्या प्रत्येक चित्रपटात ज्योतिका झळकते.



ज्योतिकाने 1998 मध्ये 'डोली सजा के रखना' या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.



ज्योतिकाने भलेही तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात बॉलिवूडमधून केली असेल, पण तिला खरी प्रसिद्धी साऊथ चित्रपटांनी मिळवून दिली.



ज्योतिकाची लव्हस्टोरी देखील अशीच काहीशी फिल्मी आहे. 1999 मध्ये आलेल्या ‘पूवेल्लम केट्टुपर’ या चित्रपटात सूर्या आणि ज्योतिका यांनी पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या.



अखेर 11 सप्टेंबर 2006 रोजी ज्योतिकाने अभिनेता सूर्यासोबत लग्न केले. दोघांचे लग्न थाटामाटात झाले. जयललिता यांनीही दोघांच्या लग्नाला हजेरी लावली होती.



ज्योतिका आणि सूर्या, दोघांनी आतापर्यंत 7 चित्रपटात एकत्र काम केले आहे. या जोडप्याला मुलगी दिया आणि मुलगा देव अशी दोन मुले आहेत. (Photo : @ jyotika/IG)