चित्रांगदाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत. तिचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रांगदा फंकी लूकमध्ये दिसत आहे. तिने आफ्रिकन स्टाईल लूकमध्ये हे फोटो काढलेत. लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिने रॅम्प वॉक केला. त्या दरम्यान तिने हे फोटोशूट केलं. चित्रांगदाने हातात वेगवेगळ्या स्टाईलच्या बांगड्या घातल्या आहेत. चित्रांगदाने डार्क मेक अप केल्याचं दिसतंय. तिने आकर्षक हेअर स्टाईल केल्याचं दिसतंय. अॅफ्रो पंक लूक असं चित्रांगदाने या फोटोखाली कॅप्शन दिलंय.