बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद यांचा मोगा मतदारसंघातून पराभव झाला आहे.

आपच्या डॉक्टर अमनदीप कौर आरोरा यांनी मालविका सूद यांचा पराभव केला.

बहिणीच्या पराभवानंतर अभिनेता सोनू सूदने पहिले ट्वीट केले आहे.

सोनू सूद सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो.

ट्विटरच्या माध्यमातून तो चाहत्यांना अपडेट्स देत असतो.

सोनूने आता मालविका सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फोटो शेअर करत सोनूने लिहिले आहे,विरोधात किती आहेत, हे आवश्यक नाही, सोबत किती आहेत, हे महत्वाचं आहे.

सोनूचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.