हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी क्रिशच्या पुढील सिक्वेलची तयारी सुरू केली आहे. 'क्रिश 4' सिनेमात हृतिक शिवाय कोणते कलाकार असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हृतिक 'विक्रम वेधा'च्या शूटिंगनंतर 'फायटर' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. 'फायटर' सिनेमाचे शूटिंग 100 दिवसांचे आहे. हे शूटिंग या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. कोई मिल गया (2003), क्रिश (2006) आणि क्रिश 3 (2013) या मालिकेतला 'क्रिश 4' हा चौथा भाग असेल. आता 'क्रिश 4' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo Credit : https://www.facebook.com/hrithikroshan/photos)