बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. देशात आणि जगात घडणाऱ्या घडामोडींवर नेहमीच ती तिची मतं व्यक्त करत असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने 'गंगूबाई काठियावाडी' नंतर आता 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर भाष्य केले आहे. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर 'द कश्मीर फाईल्स' सिनेमाचे रेटिंग शेअर केले आहेत. रेटिंग शेअर करत तिने लिहिले आहे, सिनेसृष्टीतील शांततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कंगनाचा धाकड हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या कंगना 'लॉकअप' या छोट्या पडद्यावरील मालिकेचे सूत्रसंचालन करत आहे.