भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.



या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीस बुमराहनं श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना माघारी घाडलं आहे.



डे-नाईट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय.



या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहनं कुशल मेंडिस, लाहिरू थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज आणि डिकवेलसारख्या फलंदाजांना बाद केलं.



बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.



कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भारताचा वेगवान गोलंदाज इशान शर्माच्या नावावर होता.



श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटी सामन्यात इशांतनं 54 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना 2015 साली खेळला गेला होता.



या यादीत व्यंकटेश प्रसाद तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 2001 साली कॅंडी येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने 72 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.