चित्रपटांमधून ब्रेक घेतलेली सोनम कपूर पती आनंद आहुजासोबत तिचा 'बेबीमून' साजरा करत आहे.

सद्या सोनम तिच्या गरोदरपणाचा पुरेपूर आनंद घेत आहे, हे तिच्या बेबीमून व्हेकेशनच्या फोटो आणि व्हिडिओंवरून स्पष्टपणे दिसून येते.

अलीकडेच आपल्या पत्नीसोबत लाइफ एन्जॉय करताना सोनम कपूरचा पती आनंद आहुजा याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक गोंडस पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने सोनमवरील प्रेम व्यक्त केले आहे.

गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात अभिनेत्रीची स्तुती करणारी पोस्ट लिहिली आहे.

“आमच्या पुढच्या अध्यायासाठी नेहमीप्रमाणे उत्साही आणि तयार….सर्वोत्तम गर्भवती”, आनंद याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

चाहत्या या पोस्टला हार्ट इमोजी पाठवून सोनमला शुभेच्छा देत आहेत.


सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी आनंद आहुजासोबत लग्नगाठ बांधली.

याआधी दोघांनी एकमेकांना खूप दिवस डेट केले आणि नंतर ते कायमचे एकमेकांचे बनले.