दूध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.



लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आहारात दूध समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो.



काहींना दुधाची एलर्जी असते त्यांना वगळता दूध आहारातील एक उत्तम आणि परिपूर्ण घटक मानला जातो.



दुधात प्रथिने, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम यासारखे अनेक सूक्ष्म पोषक घटक आढळतात.



दूध गरम आणि थंड अशा दोन्ही प्रकारे पिणं फायदेशीर असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.



तुम्ही ऋतूनुसार यात बदल करु शकता.



उन्हाळ्यात थंडपणा मिळण्यासाठी तुम्ही दिवसा थंड दूध पिऊ शकता.