भारताची अव्वल दर्जाची महिला क्रिकेटपटू मिताली राजने 23 वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर मितालीने बुधवारी दुपारी सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली.



मितालीच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार असून त्यापूर्वीच तिने निवृत्तीची घोषणा केली आहे.



39 वर्षीय मितालीने आजवर क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना अनेक रेकॉर्ड्स नावे केले आहेत.



मितालीला लेडी तेंडुलकर म्हटलं जातं, कारण भारतासाठी वनडे आणि टी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा तिनेच केल्या आहेत.



2017 महिला क्रिकेट विश्व चषकादर्मयान मितालीने सलग सात अर्धशतक लगावली असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर आहे.



मितालीने एकाच संघासाठी सर्वाधीक वनडे सामने खेळले असून या सामन्यांची संख्या 109 आहे.



मितालीने वनडे सामन्यात सर्वाधिक रन केले असून 232 सामन्यात तिने 7 हजार 805 रन केले आहेत.



मिताली 20 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला क्रिकेटर आहे.



200 वनडे सामने खेळणारी एकमेव महिला क्रिकेटर असून तिने 6 एकदिवसीय वर्ल्ड कपही खेळले आहेत.



टेस्ट सामन्यात दुहेरी शतक ठोकणारी मिताली एकमेव भारतीय महिला क्रिकेटर असून 2002 साली तिने इंग्लंड विरुद्ध 214 धावांची खेळी केली होती.