अभिनेत्री सोनम कपूर ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
सोनम आणि तिचा पती आनंद अहूजा यांना काही महिन्यांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाले
सध्या सोनम ही तिनं केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आहे.
सोनमनं मुंबईमधील ट्रॅफिकबाबत एक ट्वीट केलं. या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
काही नेटकऱ्यांनी सोनमच्या या ट्वीटला रिप्लाय देऊन तिला ट्रोल केलं आहे.
'मुंबईमध्ये गाडी चालवणे त्रासदायक आहे. जुहूपासून बँडस्टँडला पोहोचायला मला एक तास लागला. सर्वत्र खूप बांधकाम आणि खोदकाम, प्रदूषण होते. हे काय चालू आहे?'असं सोनमनं ट्वीटमध्ये लिहिलं.
सोनमच्या ट्वीटला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दिल्लीचे लोक मुंबईमध्ये प्रदूषणाबाबत बोलत आहेत.'
लवकरच सोनम ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.