बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी लवकरच नव्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. सोनमचा पती आनंद आहूजानं काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केलं होतं. आता सोनमचे बेबी शॉवर मुंबईत देखील होणार आहे. 17 जुलै रोजी सोनमचे बेबी शॉवर मुंबईमध्ये होणार आहे. बेबी शॉवरला स्वरा भास्कर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलाइका अरोरा, आलिया भट्ट, नताशा दलाल, जॅकलीन फर्नांडीज, दीपिका पादुकोण, मसाबा गुप्ता आणि रानी मुखर्जी हे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. सोनम आणि आनंदचा विवाह सोहळा हा सोनमच्या मावशीच्या घरी पार पडला होता. रिपोर्टनुसार, तिथेच सोनमची बोबी शॉवर पार्टी देखील होणार आहे. बोहेमियन थीम या बेबी शॉवरचे फंक्शनची असणार आहे. सोनमनं मार्च 2022 मध्ये ती प्रेग्नंट असल्याची माहिती नेटकऱ्यांना दिली होती. सोनम बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले.