शिर्डीतील साईमंदिर हे अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. दररोज या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते.



दरवर्षी शिर्डीत तीन दिवस गुरूपोर्णिमा उत्सव साजरा होतो.



शिर्डीतील तीन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरूवात झालीय.



पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा , विणा आणि पोथीची सवाद्य मिरवणुक काढून उत्सवाला सुरूवात झाली.



असंख्य पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असुन मोठा उत्साह पहायला मिळत आहे.



दोन वर्षानंतर भाविकांना उत्सवात सहभागी होता येत असल्याने भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून गेलीय.



गेली दोन वर्षे कोरोना प्रतिबंधामुळे उत्सव साध्या पद्धतीने पार पडला मात्र यावर्षी कुठलेही निर्बंध नसल्यानं साईबाबांच्या नामाचा जयघोष करत असंख्य पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.



साईबाबांची वेषभुषा परिधान करत दाखल झालेली परराज्यातील साईंच्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर याच पालखीत महिलांनी दांडिया खेळत सर्वांची मने जिंकली.



साई समाधी मंदिरांसह परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून



उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने उद्या साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे.