दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसलेली संजना संघी तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. संजना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांना थक्क केले आहे. संजनाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे, की लोकांसाठी त्यांच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे या फोटोंमध्ये संजना ब्लॅक आणि गोल्डन कलरचा वन पीस ड्रेस परिधान करताना दिसत आहे. हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने स्मोकी मेकअप केला आहे.