बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री वाणी कपूर त्यांच्या बहुप्रतिक्षित 'शमशेरा' चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. आजकाल रणबीर आणि वाणी सतत बोल्ड फोटोशूट करत आहेत. आता पुन्हा एकदा वाणी आणि रणबीरचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे. याची एक झलकही अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे या फोटोंमध्ये वाणी मेहंदी कलरची साडी परिधान करताना दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग डीप नेक ब्लाऊज पेअर केला आहे. या फोटोंमध्ये दोन्ही स्टार्सची केमिस्ट्री मस्त दिसत आहे. त्याचबरोबर वाणी खूपच हॉट दिसत आहे. 'शमशेरा' बद्दल बोलायचे तर हा चित्रपट 22 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे (photo:_vaanikapoor_/ig)