अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.



सोनालीनं नुकतेच तिचे खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



गुलाबी ड्रेस आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत.



'गुलाबी है समां' असं कॅप्शन सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे.



सोनालीच्या या लूकला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.



अनेक नेटकऱ्यांनी सोनालीच्या या फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.



अप्सरा आली या गाण्यामधील सोनालीच्या नृत्यशैलीचं अनेकांनी कौतुक केलं.



सोनाली ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट शेअर करते.