'बाहुबली' (Bahubali) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबातीचा चाहता वर्ग मोठा आहे.



राणाचा फिटनेस अनेकांचे लक्ष वेधतो. बाहुबली चित्रपटातील त्याच्या फिटनेसचं अनेकांनी कौतुक केलं.



राणाने अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका मुलाखतीमध्ये राणाने त्याच्या आरोग्याबाबत सांगितलं.



'मी माझ्या उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही म्हणून मी वेगळ्या पद्धतीने काम करतो, असं मी त्याला सांगितलं.' असं राणा दग्गुबातीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.



अनेक आरोग्य समस्यांचा सामना करणार्‍या राणाने सांगितले की, शारीरिक समस्या बर्‍याच लोकांचे आयुष्य विस्कळीत करु शकतात. त्या समस्या बऱ्या झाल्या तरीही, त्यामुळे एक प्रकारचे दडपण येते.'



पुढे तो म्हणाला, 'माझे कॉर्निया ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट झाले आहे, त्यामुळे मी टर्मिनेटर आहे असे मला वाटते. मी अजूनही जिवंत आहे आणि आयुष्यात पुढे जात आहे.'



राणाचा 'विराटपर्वम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात तो साई पल्लवीसोबत रोमान्स करताना दिसला होता.



राणाची राणा नायडू ही सीरिज काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.



राणा दग्गुबातीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.



राणाला बाहुबली या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली.