प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.



प्रियांका ही तिच्या सिटाडेल या वेब सीरिजचं प्रमोशन करत आहे.



हॉलिवूडबाबत शाहरुख खानने (Shah Rukh Khan) केलेल्या वक्तव्यावर प्रियांकाने प्रतिक्रिया दिली.



प्रियांका आणि शाहरुखने 'डॉन' आणि 'डॉन 2' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.



शाहरुखने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, मी हॉलिवूडमध्ये का जाऊ? मला इथे कम्फर्टेबल वाटते.



शाहरुखच्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले.



शाहरुखच्या वक्तव्यावर प्रियांकाने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, कम्फर्टेबल हे माझ्यासाठी बोरिंग आहे. मी घमंडी नाहीय. मला आत्मविश्वास आहे. मी जेव्हा सेटवर जाते, तेव्हा मी काय करते, ते मला माहित आहे. मला यासाठी कोणत्याही व्हॅलिडेशनची गरज नाही.'



पुढे प्रियांकाने सांगितलं, मी खूप प्रोफेशनल आहे आणि मी माझ्या प्रोफेशनल स्टाईलसाठी ओळखली जाते, हे तुम्ही माझ्या आजूबाजूच्या लोकांना विचारु शकता.'



प्रियांकाची सिटाडेल ही सीरिज जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे.



सिटाडेल वेब सीरिजसोबतच प्रियांका काही आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



Thanks for Reading. UP NEXT

आलियाच्या हिट चित्रपटांबद्दल जाणून घ्या...

View next story